मुंबई : मुंबईत तब्बल 9 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. या जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल 2 कोटी 25 लाख इतकी आहे. मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली.


जुन्या हजार-पाचशेच्या नोटांच्या मोबदल्यात या सोन्याची खरेदी होणार असल्याची माहिती आहे. स्वित्झर्लंडहून हे सोन्याचे बिस्कीट मिठाईच्या डब्ब्यातून आणण्यात आले होते.

याची माहिती मिळताच मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई करत 9 किलो सोन्यासह 7 जणांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मर्सिडीज आणि निसान कंपनीच्या कारही जप्त केल्या आहेत.