मुंबई : मुंबईत हार्बर रेल्वेमार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनवर हातोडा पडणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मध्य रेल्वे सीएसटी-कुर्ला असा नवा ट्रॅक बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला या मार्गात अनेक बदल करावे लागतील.
नव्या सीएसटी-कुर्ला रेल्वेमार्गामुळे सँडहर्स्ट रोड स्थानकासोबतच अनेक बदल केले जाणार आहेत. सीएसटीपासून कुर्ल्यापर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गाला रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठीच्या आराखडा आणि अन्य बाबी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. या मार्गामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट स्टेशन पी. डिमेलो रोडच्या बाजूलाच उभारलं जाणार आहे.
सीएसटी-कुर्ला मार्गावरील पाचव्या-सहाव्या ट्रॅकसाठी जागा उपलब्ध नसल्याने भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, सायन स्थानकांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. तसंच दादर स्टेशनच्या पश्चिमेला दोन नवे प्लॅटफॉर्म बदलण्यात येणार आहेत. हार्बर रेल्वेमार्गावर कुर्ला-सीएसटी मार्गावरही बदल होणार आहेत.
1895 ते 1900 दरम्यान फर्स्ट विस्काउंट सँडहर्स्ट मुंबईचे गव्हर्नर होते. यांच्या नावाने या स्थानकाचे नाव सँडहर्स्ट रोड ठेवण्यात आलं. 1921 साली हे स्थानक बांधण्यात आलं.