'सनातन' ही दहशतवादी संघटना, हिंदू समाजावर काळा डाग : आशिष खेतान
एबीपी माझा वेब टीम | 11 Jun 2016 02:37 AM (IST)
मुंबई : सीबीआयने अटक केलेला वीरेंद्र तावडे हा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. शिवाय, सनातन संस्था ही दहशतवादी संघटना आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी केला आहे. https://twitter.com/AashishKhetan/status/741437721420390400 “सनातन संस्थेने उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकांची यादी तयार केली आहे, ज्यांना ते संपवू इच्छित आहेत. सनातन संस्था ही दहशतवादी संघटना असून, हिंदू समाजावर काळा डाग आहे.”, असेही आशिष खेतान म्हणाले. https://twitter.com/AashishKhetan/status/741438470900572160 “वीरेंद्र तावडेच्या अटकेने दाभोलकरांचा मारेकरी सापडण्याबाबत आशा निर्माण झाल्या आहेत. एनआयएने मडगाव ब्लास्टच्या खटल्यात गोंधळ केला आणि आरोपींना पळण्यास एकप्रकारे मदतच झाली.”, असेही आशिष खेतान म्हणाले. https://twitter.com/AashishKhetan/status/741441386822635520 मोदी सरकार सनातन संस्थेविरोधात कडक पावलं उचलून, सनातनला नष्ट करेल, अशी आशा आहे. शिवाय, या संस्थेवर बंदी आणून जयंत आठवले आणि सनातनच्या इतरांना तुरुंगात पाठवेल, अशी आशा आशिष खेतान यांनी व्यक्त केली आहे. https://twitter.com/AashishKhetan/status/741445007345913856