सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेची नियमावली
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2018 04:41 PM (IST)
मुंबईत एकूण दहा हजार 700 नोंदणीकृत गणेशमंडळे आहेत.
मुंबई : अवघ्या सव्वा महिन्यात गणपती बाप्पांचं आगमन होणार असल्याने गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मंडळं सज्ज झाली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेने नियम आखून दिले आहेत. मुंबईत एकूण दहा हजार 700 नोंदणीकृत गणेशमंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळांना बीएमसीचे नियम 1. मंडपाच्या बाजूला 10 फूट अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पादचारी यांच्यासाठी जागा सोडावी 2. गणपती मंडपासाठी बीएमसी, पोलिस, वाहतूक विभाग, अग्निशमन दल यांचा परवाना घेणे आवश्यक 3. मंडपात फायर रेझिस्टंट सिस्टम असावी 4. मंडपाच्या बाहेर मंडपाच्या नकाशाचा आराखडा असणे आवश्यक 5. मंडपापासून 100 मीटर दूर भक्तांच्या गाड्यांचं पार्किंग 6. खड्डे जर खणले तर गणेशविसर्जनानंतर 10 दिवसांत बुजवले पाहिजेत. त्याचे फोटो महापालिकेला पाठवावे.