मुंबई : प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांच्यावर मुंबईतील एका हॉटेल व्यवसायिकाने ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वसूलीचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, आरोप करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकाने याबाबतचे स्टिंग केल्याचा दावा केला आहे.

पंकज ठक्कर असं या हॉटेल व्यवसायिकाचं नाव असून, त्याने चेतन कोठारींनी आपल्या विरोधात तक्रार न करण्यासाठी खंडणी मागितल्याचं दावा केला आहे. ठक्कर यांनी सांगितलं की, ''आपल्या विरोधात तक्रार करु नये, यासाठी कोठारी यांनी महिन्याला 10 हजारच्या हिशेबाने पाच लाख रुपये मागितले. यातीलच एक हप्ता देताना आप त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा,'' ठक्कर यांचा दावा आहे.

पण चेतन कोठारी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी व्हिडीओमध्ये घेतलेले पैसे हे खंडणी नसून, कंस्लटेंसी फी असल्याचं सांगितलं आहे.

याबाबात कोठारी यांनी सांगितलं की, ''ठक्कर अवैध हुक्का पार्लर चालवतो. त्यामुळे तो कारवाईपासून वाचण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यास आपल्याकडे होता.''

दरम्यान, चेतन कोठारी यांच्या स्टिंगचा पोलीस तपास करत असून, तपासानंतरच याबाबत अधिक खुलासा करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.