Robert Vadra In Mumbai : माझा धार्मिक दौरा संपूर्ण देशात असतो, सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे, राहुल गांधी सुरक्षित राहावे, देशातील लोकांची दुःख दूर व्हावीत. बेरोजगारी दूर व्हावी यासाठी बाप्पाकडे मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत लोकं जोडले जातायत, लोकांसोबत त्यांना राहायचं आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने लोकं जोडले जातायत, लोकांना ते समजून घेतायत, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत, असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले.  प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वाड्रा आज मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  


बेटी बचाव, बेटी पढाओचा नारा ही लोकं देतात, महिला सुरक्षेबद्दल बोलतात, मात्र आत्मसात करत नाहीत. लहान मुलगी शेतकऱ्यासाठी बोलली तर तिला अटक केलं, माझी मुलं देखील हे बघतायत, पुढची पिढी कशी समोर येणार, असा टोला यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर लगावला.  


राहुल गांधी धर्मांध राजकारण करत नाही , त्यामुळे भाजपची लोकं त्यांना नेहमी चुकीच्याच नजरेने पाहतात. राहुल गांधी बोलले होते कोव्हिडसंदर्भात त्सुनामी येणार मात्र त्यांनी ऐकलं नाही. प्रियांकाला देखील अटक केली होती शेतकरी आंदोलनादरम्यान. मात्र ही दोघे देखील घाबरणारी नाहीत, ते लोकांमध्ये जातील आणि देशाला सेक्युलर ठेवण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केला.  


 केंद्र सरकार जोपर्यंत आपलं राज्य होत नाही, तोपर्यंत तिथे अस्थिरता निर्माण करत राहिल. आमदार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतील आणि अनेक असंख्य गोष्टी राज्य आपल्या ताब्यात घेण्यासाठी करतील. मात्र राहुल गांधी या सर्वांपेक्षा वेगळे आहेत, काँग्रेस जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न करेल, असे वाड्रा म्हणाले.  


राजकीय अस्थिरता आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार नेहमी करत आहे. त्यामुळेच राज्यात प्रगती होत नाही. मी हिमाचलला जाणार, महाराष्ट्र देखील येणार, स्वतः राहुल गांधींसोबत  14 नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात असेल. महाराष्ट्रात कांग्रेसला फायदा होईल, लोकांना बदल हवाय, सध्याचं राजकारण चुकीचं सुरु आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या मेहनतीचं काँग्रेसला नक्की फळ मिळेल, असेही वाड्रा म्हणाले.  


आणखी वाचा  :


Homi Bhabha : परवानगी दिली तर केवळ 18 महिन्यात अणुबॉम्ब तयार करेन; डॉ. होमी भाभांच्या वक्तव्यानं जग हादरलं होतं