मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरून एका दरोडेखरोला अटक करण्यात आली आहे. इर्शाद खान असं या दरोडेखोराचं नाव आहे. मातोश्रीच्या शंभर मीटर परिसरातून आरोपी इर्शाद खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपीकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. आरोपी याठिकाणी काय करत होता, याची पोलीस कसून तपासणी करत आहेत.
इर्शाद खान हा वांद्रे येथील कलानगर परिसरात दरोडा टाकण्यासाठी आला होता. आरोपी याठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. म्हणून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच परिसरात राहत असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी असतो. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं कौतुक होतं आहे.
इर्शाद खान याठिकाणी कुठे दरोडा टाकण्यासाठी आला होता. त्याने स्वत: जवळ बंदूक का बाळगली होती, याची चौकशी पोलीस करत आहेत.आरोपी इर्शाद खानवर मुंबईसह गुजरातमध्ये हत्या, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
माझं गाव माझा जिल्हा | वाशिममध्ये पाऊस, रब्बी पीक धोक्यात | ABP Majha