मुंबई : मागील 35 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. सरकारकडून पुढे काही निर्णय होईल असं वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि आंदोलक आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. सरकारने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर मराठा क्रांती मोर्चा विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून आंदोलन तीव्र करतील, असा इशारा शिष्टमंडळानं सरकारला दिलाय.


आजच्या बैठकीला मराठा समाजातील आंदोलकांचे वकील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार आणि आंदोलकांचं एक शिष्टमंडळ उपस्थित होतं. या बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. मात्र, सरकार आमच्या मागण्यांवर सकारात्मक नसल्याचे बैठकीनंतर आंदोलकांनी सांगितले. या प्रश्नावर कायदेशी पद्धतीने काय करता येईल, हे पाहू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. किमान 11 महिन्याच्या करारावर विद्यार्थ्यांना जॉईन करुन घ्या, अशी मागणी आम्ही केली. मात्र, सरकारने ही गोष्ट मान्य केली नाही. इथले अधिकारी नकारात्मक पद्धतीने काम करत असल्याचा आरोपही यावेळी शिष्ट मंडळाने केलाय.

मुंबईत आझाद मैदानातील मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली; गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन सुरुच

विद्यार्थ्यांनीच सुप्रिम कोर्टात जावे -
सरकार सरकारची बाजू मांडत आहे. तरी, आता विद्यार्थ्यांनीच सुप्रिम कोर्टात जावे, असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय. पाच विद्यार्थ्यांसाठी साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्यात 35 हजार जागा खाली आहे. मात्र, या रिकाम्या जागांवर उमेदवार भरायला सरकार तयार नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आता हे आंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिलाय. आंदोलकांनी जोपर्यंत मागण्या मान्य होतं नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. आज दुपारी 12 वाजता खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले देखील आंदोलकांची भेट घेणार आहेत. यावेळी राज्यातील मराठा समाजातील समन्वयक एकत्र येऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर अशोक चव्हाणांचा दावा

मराठा आंदोलकाची प्रकृती खालावली -
मुंबईतील आझाद मैदान इथं आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकाची प्रकृती खालावलीय. इथं एका आंदोलक तरुणाला भोवळ आलीय. गेल्या 34 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करतायत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरु केलाय. मात्र, या आंदोलकांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची धार तीव्र करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलय. मुंबईतील आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल होत आहेत. यावेळी या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

Maratha Morcha | आझाद मैदानातील मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या करेपर्यंत आंदोलन कायम