मुंबई: मुंबईच्या धारावी परिसरात एसबीआय बँकेच्या एटीएम कॅश व्हॅनमधील दीड कोटी रुपये असलेली पेटीच लुटली आहे. या प्रकारामुळं धारावी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या लुटीमुळे सुरक्षेचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत.
ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून दोन चोर पेटी घेऊन पळत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. सध्या या सीसीटीव्ही फूटजेच्या आधारे पोलीस चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.
तब्बल दीड कोटी रक्कम असलेली पेटी चोरट्यांनी भरदिवसा लुटल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.