मुंबई : राम मंदिरावरुन देशात दंगल घडवून आणली जाणार आहे, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, राम मंदिरावरुन आता देशात कुठेही दंगली होणार नाहीत. जर कोणाला याबाबत काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे, असे उत्तर देत राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीसारख्या लोकांना हाताशी घेऊन देशात दंगली घडवण्याबाबत बोलणी सुरू आहेत, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राम मंदिरावरुन आता काही दंगल होणार नाही. कारण हा मुद्दा आता केवळ मंदिरापुरताच उरला आहे. याबाबत कुणाला काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांनी कळवावे.
काँग्रेसचा राजच्या सुरात सूर
दरम्यान भाजप आणि एमआयएम एकच असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आणि सचिन सावंत यांनी करत राज ठाकरे यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
वाचा : राम मंदिराच्या मुद्यावरुन देशात दंगली घडवण्याचा कट : राज ठाकरे
दंगलीबाबत माहिती असेल तर पोलिसांना कळवा, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Dec 2018 01:41 PM (IST)
राम मंदिरावरुन आता देशात कुठेही दंगली होणार नाहीत. जर कोणाला याबाबत काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे, असे प्रतिपादन करत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -