मुंबई : सुप्रसिद्ध हृदयरोग विशेषज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) आणि बॉम्बे हॉस्पिटलचे मानद डीन डॉ. बी. के. गोयल यांचं निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास गोयल यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर गोयल यांना तातडीने ब्रिच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र हॉस्पिटलला पोहचताच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
गोयल यांच्या पश्चात पुत्र राहुल, तसंच संध्या मितरसेन, अलका झुनझुनवाला आणि वर्षा सेठी या तीन कन्या आहेत.
देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या हृदयावर गोयल यांनी उपचार केले आहेत. बॉम्बे हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे ते प्रमुख होते. जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डिओलॉजी विभागात ते संचालक-प्राध्यापक होते.
डॉ. बी. के. गोयल यांनी मुंबईचं शेरीफपदही भूषवलं होतं. भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने (2005) त्यांना सन्मानित केलं होतं.
पद्मविभूषणने सन्मानित कार्डिओलॉजिस्ट डॉ. बी के गोयल यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2018 11:30 PM (IST)
हृदयविकाराच्या धक्क्यानंतर बी के गोयल यांना तातडीने ब्रिच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र हॉस्पिटलला पोहचताच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -