‘वॉटर बाऊझर विथ टॅावर मॅानिटर’ असं या गाडीचं नाव आहे. या गाडीच वैशिष्ट्य म्हणजे अगदी ज्या ठिकाणी स्फोटक परिस्थिती असेल किंवा ज्या आगीच्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही. त्या ठिकाणापासून 100 मीटर दूर उभं राहून आग विझवता येते. तर या गाडीला 16 मीटर उंच असा बूम बसवला असून, तो 16 मीटर उंच जावून त्यातून पाण्याचा फवारा मारता येतो. ही गाडी संपूर्णपणे रिमोट कंट्रोलवर हाताळता येणार आहे.
आगीच्या ठिकाणी जर तीन फुटाच्या वर आगीच्या ज्वाला असतील, तर परिसर कॅमेऱ्याच्या सहय्याने लोकेट होऊन गाडीतल्या कर्मचाऱ्याला त्याचा सिग्नल मिळणार आहे. 70 मीटरपर्यंतची आग विझवण्याची क्षमता या गाडीत आहे. या गाडीमुळे आग विझवताना कर्मचारी जखमी होण्याची शक्यता कमी असून, रिमोट आणि कॅमेऱ्याच्या सहय्याने आग विझवता येणार आहे.
मुंबई आणि ठाणे महानगर पालिकेतही अशा प्रकारची अत्याधुनिक गाडी पाहावयास मिळणार नाही. गाडीच्या वर 360 डिग्री कॅमेरा असल्याने गाडी चालू असताना देखील आजूबाजूच्या परिसरावर कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवता येणार आहे. या गाडीची किंमत 1 कोटी 80 लाख इतकी आहे.