मुंबई : रेमडेसिवीरचा पुरवठा कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात माणसं मृत्यूमुखी पडत असताना भाजप  रेमडेसिवीरचा जो पुरवठा करत आहे त्याचा निषेध आप करताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे की भाजप नेते प्रसाद लाड हे भाजपच्या बाजूने दमणला जाऊन येऊन ब्रुक फार्मा कंपनीला भेट देऊन आले. ज्यानंतर त्यांनी रेमडेसिवीरच्या आयातीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारचा वापर केला आणि हीच ताकद वापरून भाजपा ने ब्रुक फार्माकडून रेमडिसिवीरचे स्टॉक विकत घेतले. 


राजकीय पक्ष हे इलेक्शन कमिशन ला रजिस्टर असतात, चॅरिटी कमिशनदा नाही ! कोणत्याही प्रकारच्या डोनेशनसाठी एखाद्या पक्षाने ड्रग्ज, औषधं विकत घेणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे, हा मुद्दा अधोरेखित आपकडून फडणवीसांच्या या कृत्यावर गंभीर आरोप करण्यात आले. 


देवेंद्र फडणवीसांनी हे उघडपणे म्हटलं की भाजपानं रेमडेसिवीर हे औषध चॅरिटीसाठी खरेदी केलं. म्हणूनच त्यांच्यावर, भाजपावर आणि त्यांच्या कार्यालयीन सदस्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात द्यायलाच हवेत असा सूर आपकडून आळवला जात आहे. शिवाय ज्या प्रकारचं अत्यंत हीन दर्जाचं राजकारण राज्य सरकारविरूद्ध सध्या खेळलं जात आहे ते पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरची खरेदी करणं याचा हेतू नागरिकांना मदत करण्याचा नसून त्याचा पुरवठा करण्याचाच असावा ही शंकाही व्यक्त करण्यात आली. 


आपकडून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे. सदर कृत्य एखाद्या सामान्य माणसाने केलं असतं तर त्याला भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या सेक्शन 353 च्या आधाराखाली तुरुंगात डांबण्याच्या शिक्षेची तरतूद आहे याकडेही आपनं लक्ष वेधलं आहे. 


भाजपने रेमडेसिवीरच्या केलेल्या साठ्यासंदर्भात आणि कायदा तोडून बेकायदेशीर चॅरिटी करण्याचे प्रयत्न केल्याच्या संदर्भात आप भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी आपनं केली आहे. 


नेमकं काय झालं होतं? 


भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे पाच दिवसांपूर्वीच या कंपनीत जाऊन भेट देऊन आले होते. प्रदेश भाजपला 50 हजार रेमडेसिवीरची इंजेक्शने देण्याची तयारी या कंपनीने दाखवली होती. ही इंजेक्शने महाराष्ट्र सरकारला देण्याचे या दोन्ही नेत्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आज सकाळी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा सामनाही रंगला होता. पण मध्यरात्री हा वाद थेट पोलीस स्थानकात पोहोचला.


Bruck Pharma कंपनीच्या संचालकांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी पोलीसांनी त्यांना पार्ले येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले. ही माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मिळाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली.