ठाणे :  ठाण्यात कोरोनाची संख्या वाढत असतानाच ठाणे महानगर पालिका कोरोनाच्या लढाईसाठी सुसज्ज होते आहे. ठाणेकरांना Covid-19 वर परिणामकारक असलेल्या Remdesivir - 100 mg हे इंजेक्शन आता अवघ्या 1200 रुपयांपेक्षा कमी दारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे Remdesivir - 100 mgइंजेक्शनसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.


 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांची संख्या वाढल्यास औषध पुरवठा कमी पडू नये म्हणून ठाणे महापालिकेने सुसज्ज तयारी केलेली आहे. गुरुवारी 18 मार्च रोजी ठाणे महापालिका आणि अन्न व औषधी प्रशासनाचे सह आयुक्त वि. तू. पौनीकर यांची बैठक झाली. या बैठकीत Remdesivir - 100 mg हे इंजेक्शन माफक दारात नागरिकांना उपलब्ध व्हावे याबाबत चर्चा करण्यात आली आणि अंतिम निर्णय घेण्यात आला. 


रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि गरिबांचे मृत्यू थांबवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


त्यामुळे ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालय, बेथनी रुग्णालय, ठाणे, अव्हेन्यू हॉस्पिटल, कार्डीनल ग्रेसिअस हॉस्पिटल, वसई, रिद्धी विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नालासोपारा, सिराज हॉस्पिटल, शिवडी, काझी हॉस्पिटल, भिवंडी, अलमोइन हॉस्पिटल, भिवंडी, आयुष्य हॉस्पिटल, कल्याण, साई क्रिटीकेअर हॉस्पिटल, उल्हसनगर, रिलायन्स हॉस्पिटल, कोपरखैरणे, नवी मुंबई, एम.व्ही.सी. केमिस्ट ऐरोली, शिल्पा मेडिकल कळंबोली, रायगड, सुख हॉस्पिटल पनवेल रायगड, या रुग्णालयात आता Remdesivir - 100 mg इंजेक्शन हे किमान 1200 रुपयांमध्ये किंवा त्यापेक्षाही स्वस्त मिळणार आहे. 


Remdesivir Injection | राज्य सरकारकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर निश्चित


Remdesivir - 100 mg इंजेक्शनचे उत्पादन हेट्रो ड्रग, सिप्ला लि, बीडीअर लि , झायडस कॅडीला हेल्थकेअर लि., ज्यूविलीट फार्मास्युटिकल लि., सन फार्मास्युटिकल, मायलान लि. या कंपनीचे हे उत्पादन असून याची किंमत विविध असल्याने इतर रुग्णालयात हे इंजेक्शन 10 टक्के दराने सूट देत रुग्णास उपलब्ध करण्यात आलेली आहेत. मात्र यापुढे Remdesivir - 100 mg हे इंजेक्शन निर्धारित दरानेच विक्री करण्यात येणार असल्यााची माहिती ठाणे अन्न व औषधी प्रशासनाचे सह आयुक्त वि. तू. पौनीकर यांनी दिली. 


कोरोनावर उपलब्ध औषधं सर्वसामान्यांना योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला हवीत : हायकोर्ट