डोंबिवली (मुंबई) : डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस इंटरप्राइजेस कंपनी स्फोटाचा अखेर उलगडा झाला आहे. कंपनीत साठवून ठेवलेल्या प्रोपाझील क्लोराइड केमिकलमध्ये आग लागल्यामुळे स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.


 

प्रोपोझील क्लोराईड केमिकल हा जवलनशील पदार्थ असल्याने त्या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरु होतं आणि त्याच ठिकाणी ठिणगी उडून स्फोट झाला, अशी माहिती समोर आली आहे.

 

भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली

 

डोंबिवली एमआयडीसीत स्फोटात 23 जणांचा मृत्यू, तर सुमारे 161 जण जखमी झाले. डोंबवली एमआयडीसीतल्या प्रोबेस एन्टरप्रायजेस या केमिकल बनवणाऱ्या कंपनीत केमिकल रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला.

 

स्फोट इतका भीषण होता की 5  किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरुन गेला. परिसरातल्या इमारतींच्या, गाड्यांच्या काचा फुटल्या. टपऱ्यांवरील पत्रे उडाले, तर शेजारील इतर केमिकल कंपन्याही उद्ध्वस्त झाल्या होत्या.