मुंबई : डॉक्टरला देवाचं दुसरं रूप म्हटलं जातं, पण या पेशाला काळिमा फासणारं धक्कादायक कृत्य मुंबईतील एका वयस्कर डॉक्टराने केलं आहे. आपल्या महिला रुग्णावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मेघवाडी पोलिसांनी मुंबईतील एका 58 वर्षीय डॉक्टरला अटक केली आहे. अश्लील व्हिडीओ क्लिप बनवून ती सोशल माध्यमात पोस्ट केल्याचाही डॉक्टरवर आरोप आहे. हॉलिडे कोर्टाने रविवारी आरोपीला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीडित तरुणी जोगेश्वरी पूर्वेला आपल्या आई-वडिलांसोबत राहते.
पीडित तरुणी मूळव्याधाच्या आजाराने ग्रस्त होती. आरोपी डॉक्टर तिच्यावर या आजारासाठी उपचार करत होता. पीडित तरुणीला वेदना होत असल्याने 28 मे 2015 रोजी डॉक्टरने तिला इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर तिला झोप लागली. जेव्हा ती घरी आली तेव्हा आरोपी डॉक्टरने तिच्या मोबाईलवर एक क्लिप पाठवली होती. या व्हिडीओमध्ये ती आणि आरोपी डॉक्टर आक्षेपार्ह अवस्थेमध्ये होते.
याबद्दल कुठे वाच्याता करु नको अशी धमकी डॉक्टरने दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा पीडित तरुणी जाब विचारण्यासाठी आरोपी डॉक्टरच्या क्लिनिकवर पोहोचली. तेव्हा त्याने शारीरिक संबंधांना नकार दिल्यास क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी डॉक्टरने तिला अनेक वेळा कोणी नसताना क्लिनिकवर बोलावले आणि तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केली, असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.
डिसेंबर 2018 मध्ये पीडित तरुणीचे लग्न झाले आणि ती सासरी घरी गेली. अलीकडे हा डॉक्टर पुन्हा पीडित तरुणीच्या संपर्कात आला. त्याने पुन्हा लैंगिक संबंधांसाठी तिच्यावर दबाव टाकला. आपले म्हणणे ऐकले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. त्याचे म्हणणे न ऐकल्याने तीन ऑक्टोबरला पीडित तरुणीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर तिची आणि डॉक्टरची क्लिप त्याने पाठवली. जेव्हा पीडितेच्या पतीने याबद्दल आपल्या बायकोला जाब विचारला. तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोघे नवरा-बायको पोलीस स्टेशनला गेले आणि आरोपी डॉक्टरविरोधात तक्रार नोंदवली. हॉलिडे कोर्टाने रविवारी आरोपीला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला रुग्णावर बलात्कार, आरोपी डॉक्टरला पोलीस कोठडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Oct 2019 09:14 PM (IST)
शारीरिक संबंधांना नकार दिल्यास क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी डॉक्टरने तिला अनेक वेळा कोणी नसताना क्लिनिकवर बोलावले आणि तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केली, असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -