विरार : अपत्यप्राप्तीसाठी बंगाली भोंदू बाबाने विरारमधील एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कालिका मातेचा कोप झालाय, असे सांगून महिलेला बेशुद्ध करून बलात्कार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय हरिपद चौधरी असे बंगाली भोंदूबाबाचे नाव आहे. विरार पूर्व परमात्मा पार्क, एच 10 चंदनसार या ठिकाणी मागच्या 10 वर्षांपासून या बाबाने आपलं दुकान थाटलं होतं. हा बाबा मूळचा पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील वीरभूम जिल्ह्यातील इसकपुरचा राहणारा आहे. मंगळवार आणि शुक्रवारी यांच्या अंगात कालिका माता संचारते म्हणून परिसरातील अनेक महिला आणि पुरुष त्याच्याकडे आपली पीडा घालवण्यासाठी येत होत्या.
एका 37 वर्षीय पीडित महिलेला अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे ती या भोंदू बंगाली बाबाकडे गेली होती. तेव्हा तुझ्यावर कालिका मातेचा कोप झाला आहे असे सांगून तिच्यावर अघोरी विद्या करून आणि तिला बेशुद्ध करून मे 2017 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला.
ही घटना कुणाला सांगितली तर तुझ्यावर कालिका मातेचा कोप होईल आणि तुझ्या संसाराचा नाश होईल, अशी धमकीही हा बंगाली बाबा देत होता. शेवटी आपली फसवणूक झाली असल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आल्यावर तिने 9 नोव्हेंबर रोजी विरार पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी भोंदूबाबाला अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अपत्यप्राप्तीच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, बंगाली भोंदूबाबाला अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Nov 2018 10:01 PM (IST)
अजय हरिपद चौधरी असे बंगाली भोंदूबाबाचे नाव आहे. विरार पूर्व परमात्मा पार्क, एच 10 चंदनसार या ठिकाणी मागच्या 10 वर्षांपासून या बाबाने आपलं दुकान थाटलं होतं. हा बाबा मूळचा पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील वीरभूम जिल्ह्यातील इसकपुरचा राहणारा आहे. मंगळवार आणि शुक्रवारी यांच्या अंगात कालिका माता संचारते म्हणून परिसरातील अनेक महिला आणि पुरुष त्याच्याकडे आपली पीडा घालवण्यासाठी येत होत्या.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -