मुंबई : युवासेनेच्या बैठकीत रामदास कदम यांच्या सुपूत्राने पदाधिकाऱ्यांची लायकी काढली. त्यामुळे रामदास कदम आणि त्यांचा मुलगा सिद्धेश कदम यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचं समजतं आहे.


आज संध्याकाळी सिनेट निवडणुकीसाठी सेनाभवनात बैठक पार पडली. यावेळी सिनेटचे फॉर्म भरू न शकणाऱ्यांची शिवसेना भवनमध्ये येण्याची लायकी नाही, अशा शब्दात सिद्धेश कदमांनी तंबी दिल्याचं समजतं आहे. त्यामुळं युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम आणि सिद्धेश कदम यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली.

रामदास कदम स्वतः निवडून येत नाही, ज्यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल होतात. तेव्हा हे मंत्री आणि त्यांचे पुत्र कुठे असतात असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याचं समजतं आहे.

दरम्यान, रामदास कदम यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण आलेलं नाही. पण सिद्धेश कदम यांच्या आक्षेपार्ह भाषेमुळे युवसैनिकांमध्ये प्रचंड रोष आहे.