नवी मुंबईतील रबाळेमध्ये 11 लाखांचा अवैध दारुसाठा जप्त, एकास अटक
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 15 Jun 2017 11:20 PM (IST)
नवी मुंबई : रबाळेमध्ये 11 लाखांचा अवैध दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय गवस याला अटक करण्यात आली असून, तिघे जण फरार आहेत. मुकुंद चेक पोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान टेम्पोचा संशय आल्याने रबाळे पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला. यावेळी तपासणी दरम्यान आठ लाख रुपये किंमतीचे दारूचे 400 बॉक्स सापडले. ही दारु अंबरनाथच्या खोणीफाटा येथील शेट्टी नावाच्या इसमाकडे नेण्यात येत होती. या ठिकाणावर छापा मारुन पोलिसांनी अडीच लाख रुपये किंमतीचे 135 बॉक्स दारु हस्तगत केली. या गुन्ह्यामधील गोडाऊनचा मालक, दारू पाठवणारा व्यापारी आणि टेम्पोचा मालक फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.