याआधी 2014 साली आदित्य ठाकरेंनी याच उद्यानातून वाघ दत्तक घेतला होता. याची आठवण जेव्हा आठवलेंना करुन देण्यात आली त्यावर 'आधी टायगर आणि पँथरचं भांडण व्हायचं, मात्र आता दोघं सोबत असल्यानं आम्ही पूर्ण जंगल साफ करु.’ असं आठवले गंमतीत म्हणाले.
'मी दलित पँथर संघटनेमधून आलो आहे, त्यामुळे बिबट्या दत्तक घेणं हा दलित पँथर संघटनेविषयी प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे.’ असंही आठवले यावेळी म्हणाले.