जोगेश्वेरी-गोरेगाव दरम्यान नव्या स्टेशनचं नाव 'राम मंदिर', सरकारचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2016 11:21 PM (IST)
मुंबई: जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान बांधलेल्या नव्या रेल्वे स्टेशनला राम मंदिर स्टेशन असं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 27 तारखेला या नव्या स्टेशनचं उद्घाटन होणार आहे. मात्र राष्ट्रवादीनं याला विरोध केला आहे. गोरेगाव-जोगेश्वरीमधील त्या स्थानकाचे नाव ओशिवरा ठेवणे अपेक्षित असताना राम मंदिर स्थानक का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी पुन्हा एकदा राम मंदिराचे भांडवल केलं जात आहे. त्यामुळं जनतेने सावध राहावं असंही मलिक यांनी म्हटलं आहे.