नवी मुंबई: अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, या राज ठाकरे यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाह. जातियवाद कमी करण्यासाठी असलेला हा कायदा रद्द करण्याचा दोन्ही सरकारांना अधिकार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.

 

नवी मुंबईतील स्वप्निल सोनावणे हत्येत दोषी पोलीस अधिकार्यावर कारवाई होणारच असल्याचे बडोले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सामाजिक न्यायमंत्र्यांनी आज नवी मुंबईतील स्वप्नील सोनावणेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चाही केली.

 

अहमदनगरमधील पाथर्डी प्रकरणातील निर्भायाच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करत, राज्य सरकारवरही चांगलेच तोंडसुख घेतले होते. यावर बडोले यांनीही प्रतिक्रीया देताना राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.