मुंबई: बांधकाम क्षेत्रातील नावजलेल्यालोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्रलोढा यांना मुंबई पोलिसांकडून अटककरण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केल्याने बांधकाम आणि उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात राजेंद्रलोढा यांना आरोपी बनवण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्यावर ही अटकेची कारवाई झालेली आहे. राजेंद्रलोढा हे या कारवाईपूर्वीचलोढा ग्रुपच्या संचालक पदावरून पायउतार झाले होते. आता, त्यांच्यावर अटकेची (Police) कारवाई करण्यात आली आहे. 

राजेंद्रलोढा यांना वरळी परिसरातून अटक करण्यात आलेली असून आज कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेंद्रलोढा यांनी लोढा ग्रुपची 85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, मंत्री मंगलप्रभातलोढा यांचे सुपुत्र अभिषेक लोढा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. राजेंद्रलोढा यांनी लोढा ग्रुपचे सध्याचे संचालक आणि मंत्री मंगलप्रभातलोढा यांचे सुपुत्र अभिषेक लोढा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

राजेंद्रलोढायांच्यावरलोढा ग्रुपकडून कारवाई होणार असल्याने त्यांनी आपल्या हस्तकला अभिषेक लोढा यांच्याकडे पाठवून ते एक सुसाईडबॉम्बर असून त्यांच्यावर कारवाई झाल्यास ते अभिषेक लोढा यांचे बरेवाईट करणार असल्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. राजेंद्रलोढा यांनी अधिकार नसतानाही अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहणकरुन तसेच लोढा ग्रुपमधील अनेक फ्लॅटची परस्पर विक्री करुनजंगम मालमत्ता कमावल्याचे समोर आले आहे. त्यातूनच लोढाग्रुपच्यावतीने त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत कारवाई करण्यात आली.

राजेंद्रलोढा यांनी 17 ऑगस्ट 2025 पासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या वर्तनाशी संबंधित काही बाबी आणि कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं कंपनीतील नितिमत्ता समितीच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर, कंपनीकडून ही कारवाई करण्यात आल्याचे यापूर्वी लोढाडेव्हलपर्सने जाहीर केले होते. त्यामुळे, गेल्याच महिन्यात पायउतार झाल्यानंतर आज त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा

Video: त्याला सोडलं जाणार नाही, मी स्वतः पोलीस आयुक्ताशी बोललोय; मीनाताईंच्या पुतळाप्रकरणी एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया