कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीतील गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे महापालिकेत दाखल झाले आणि महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी विकासकामांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले.


राज ठाकरेंची केडीएमसी आयुक्तांशी चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केडीएमसीचे आयुक्त पी. वेलारासू यांच्यात चर्चा झाली. फेरीवाले, शहरातील स्वच्छता यांसह विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी आयुक्तांशी चर्चा केली.



कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर कारवाई का नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी आयुक्त पी. वेलारासू यांना विचारला. त्याचसोबत, रेल्वेची हद्द आणि पालिकेची हद्द एकदाच निश्चित करण्याचीही मागणी राज यांनी केली.

कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित बदली करण्याबाबत राज ठाकरेंनी आयुक्तांना सुचवलं. शिवाय, शहर स्वच्छ दिसायला हवं, असे सांगत राज ठाकरेंनी आयुक्तांकडे आपल्या मागण्या मांडल्या.

राज ठाकरेंकडून कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. डोंबिवली शहरात पक्षाअंतर्गत फेररचना केली. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना घरी बसवून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

केडीएमसीत मनसेचे गटनेते असलेले प्रकाश भोईर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद, तर दीपिका पेडणेकर महिला जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा हे यांचं कार्यक्षेत्र असणार आहे. प्रकाश भोईर यांच्या रुपाने सक्षम जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात मनसेला आक्रमक आणि पूर्वीच्या पद्धतीने आंदोलनं करताना पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या संघटनेतील बदल पुढीलप्रमाणे :