राज ठाकरेंच्या मुंबईतील पहिल्या सभेची तारीख ठरली!
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 06:16 PM (IST)
मुंबई : राज्यभर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असताना, यात राज ठाकरेंचा मनसे पक्ष काहीसा मागे पडला होता. मात्र, आता राज ठाकरेंचा झंझावती दौरा जाहीर झाला आहे. येत्या 14 फेब्रुवारीपासून राज ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मुंबईत 14 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे मुंबईत एकूण 3 प्रचारसभा घेणार आहेत. राज ठाकरेंची मुंबईत 14 फेब्रुवारीला विक्रोळीमध्ये पहिली सभा, त्याच दिवशी विलेपार्ले येथे दुसरी सभा होईल. तर तिसरी सभा 18 फेब्रुवारीला दादरमध्ये होईल. ठाणे, नाशिक आणि पुण्यातही राज ठाकरे यांच्या प्रचार सभा होणार आहेत. मात्र, मुंबई वगळता इतर सभांच्या तारखा आणि ठिकाणं यांची माहिती मिळू शकलेली नाही. सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावल्याने राज ठाकरे काहीसे मागे पडले होते. त्यामुळे प्रचारात उशिराने एन्ट्री करुन राज ठाकरे कशाप्रकारे बाजी मारतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.