मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा 10 जानेवारीला  निकाल जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी  एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. खरी शिवसेना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांचीच आहे. त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात  निकालावर समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही बाजून प्रतिक्रिया आल्या. मात्र  उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) बंधू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. पहिल्यांदाच राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी वर्तुळ पूर्ण झाले, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मनसेच्या विक्रोळी महोत्सवात त्या बोलत होत्या.


एकीकडे सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियनच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंची पाठराखण करणाऱ्या शर्मिला ठाकरेंच्या  मनातील खदखद पुन्हा समोर आली. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, एका वाक्यात सांगायचे झाले तर आज (10 जानेवारी - शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निर्णयाचा दिवस) वर्तुळ पूर्ण झाले आहे.  शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना या माणसामुळे बाहेर जायला लागलं होतं. त्याच्याच हातातून पक्ष सुटला आहे. 


तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? : शर्मिला ठाकरे


या अगोदर देखील आदित्य ठाकरेंनर आरोप होताना शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केल होती. शर्मिला ठाकरेंनी पाठराखण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी   आभार मानले होते.त्यावेळ उद्धव ठाकरेंवर  शर्मिला ठाकरेंनी जोरदार पलटवार केला होता.  मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? असा सवाल शर्मिला ठाकरेंनी यांनी केला होा आहे. 


उद्धव ठाकरेंमुळे सोडला होता पक्ष : राज ठाकरे 


राज ठाकरेंनी देखील उद्धव ठाकरेंमुळे अनेकांना पक्ष सोडावा लागल्याचे सांगितले. उद्धव आणि त्याच्यासोबतच्या लोकांना कंटाळून शिवसेना सोडली.  जेव्हा शिवसेना या पक्षातून बाहेर पडलो  त्यानंतर माझ्याविषयी अपप्रचार केला गेला, असेही  राज ठाकरे म्हणाले.27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. या घटनेला जवळपास 18 वर्षं पूर्ण झाली आहेत. गेल्या 18 वर्षांत बरंच काही घडलं. दोघांनी एकमेकांविरोधात तीव्र टीका केली. आरोप-प्रत्यारोप केले. तर काही वेळेला कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र दिसले.


हे ही वाचा :


Ram Mandir : 22 जानेवारीला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय - राज ठाकरे