मुंबई: मी आतापर्यत पक्षात खूप लोकशाही पाळली, मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वपक्षीय नेत्यांना दिला.

 

निवासस्थान 'कृष्णकुंज'वर बोलावलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांना हा इशारा दिला.  गेल्या काही दिवसांपासून मनसेला गळती लागली आहे. अनेक नगरसेवक, नेते मनसेला राम-राम ठोकून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी पक्ष कार्यकर्ते, नेत्यांना चांगलाच दम दिला.

 

"मी आतापर्यत पक्षात खूप लोकशाही पाळली, मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका. तुम्ही पैशासाठी अन्य पक्षात जाणार असाल तर ते सारे क्षणिक आहे, व्यर्थ आहे. तुमच्या काही समस्या असतील तर त्या थेट माझ्याकडे मांडा, मी उपलब्ध आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

गेल्या महिनाभरात मनसेचे मुंबईतील 3 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले. तर नाशिकमध्येही अनेक नगरसेवकांनी शिवसेना- भाजपमध्ये प्रवेश केला.

 

या गळतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईतील नगरसेवकांची बैठक बोलावली होती.  मुंबई महापालिकेत मनसेचे 27 नगरसेवक होते. त्यापैपैकी आता 22 नगरसेवकच पक्षात उरले आहेत.

 

प्रकाश दरेकर (भाजप), गीता चव्हाण ( शिवसेना + पक्षाकडून निलंबित), सुखदा पवार ( निलंबित ),  ईश्वर तायडे ( शिवसेना ), सुरेश आवले ( शिवसेना ) यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.