Raj Thackeray Speech Live Updates: माहीम दर्गा अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण
Raj Thackeray LIVE: मशिदीवरील भोंगे, मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेना, भाजप यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. सभेसाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत जमत आहेत
माहीम दर्गा अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण
समुद्रातील आतील भागात बांधकाम असल्याने सदर अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण.
मुंबई जिल्हाधिकारी यांच्या हद्दीत या संदर्भात कारवाईचे अधिकार आहेत.
मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील.
मुंबई महापालिका कायद्यानुसार समुद्राच्या किनाऱ्याच्या आतील भागात मुंबई महापालिकेची हद्द संपते, त्यामुळे या हद्दीमध्ये मुंबई महापालिका कारवाई करू शकत नाही.
तरीसुद्धा मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील.
मुंबई महापालिका अधिकारीसुद्धा या संदर्भात पाहणी करणार आहेत.
Raj Thackeray Speech : माहिमच्या समुद्रामध्ये दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असं आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिलं.
Raj Thackeray Speech : मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत. एक तर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही ते काढतो असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Speech Live Updates: मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम हवेत, त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनाच खडे बोल सुनावले, त्यांच्यासारखे महाराष्ट्रातील मुस्लिम मला हवेत असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Speech Live Updates: शिवसेना फुटल्यानंतर अलिबाबा आणि 40 जण बाहेर गेले. महाराज सुरतेवरून लूट करुन महाराष्ट्रात आले... पण महाराष्ट्रातून लूट करून सुरतेला गेलेले हे पहिलेच. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, राज्यासाठी काम कर, उद्धव ठाकरे यांच्या मागे भाषणं देत फिरू नका असा टोला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
आज शिवसेनेची अवस्था वाईट झाली असून बाळासाहेब असते तर शिवसेना फुटली नसती असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Speech Live Updates: नारायण राणे बाहेर गेलेच नसते, त्यांच्या मनात पक्ष सोडून जायचं नव्हतं. त्यावर मी त्यांना बाळासाहेबांना भेटायला जाणार होतो, पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे आधी हो म्हणालेल्या बाळासाहेबांनी नंतर राणेंना भेट द्यायला नकार दिला. त्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात होता.
Raj Thackeray Speech Live Updates: सगळ्यांना फक्त महाबळेश्वरची घटना सांगितली जाते. त्या आधीचं लोकांना माहिती हवंय म्हणून सांगतोय. मी उद्धव ठाकरे यांना म्हणालो होतो की, तुला काय हवंय? मला फक्त प्रचारापुरतं बाहेर काढू नका... त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की ठिक आहे.
त्यानंतर बाळासाहेबांच्या समोर त्यांना सगळं मिटल्याचं सांगितलं. पण त्यावेळी उद्धव ठाकरे आलेच नाहीत. त्यांना फक्त मी बाहेर जावं असं वाटतं होतंय
Raj Thackeray Speech Live Updates: शिवसेना म्हणजे शिवधनु्ष्य... बाळासाहेबांना सोडून कुणालाही झेपणार नाही याची कल्पना होती. एकाला झेपलं नाही, आता दुसऱ्याला झेपेल का नाही ते माहिती नाही असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला.
Raj Thackeray Speech Live Updates: शिवसेना आणि धनुष्यबाण यावरुन जो वाद सुरू होता त्यामुळे वेदना होत होत्या, कारण लहानपणापासून शिवसेना अनुभवली. असंख्य लोकांनी घामातून उभी केलेल्या संघटनेची अवस्था अशी होताना वाईट वाटत होता.
Raj Thackeray Speech Live Updates: अनेकांनी म्हटलं होतं की हा संपलेला पक्ष आहे.... जे बोलले त्यांची अवस्था काय झालीय असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरेंच्या हाती शिवसेना असती इतके लोक सोडून गेले नसते, एकनाथ शिंदे, नारायण राणे, भुजबळ बाहेर गेले नसते असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. 2017 साली मी युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो होतो, पण उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असंही ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा असून त्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आपल्यालाही आहे असं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
मनसेच्या गुढीपाडव्याचा मेळाव्याची उत्सुकता राज्यातील सर्वच मनसैनिकांमध्ये आहे. राज्यभरातून मिळेल त्या वाहनाने मनसे सैनिक येत आहेत. आजच्या सभेबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. मुंबईतील शाखामध्ये ही लगबग पाहायला मिळत आहे
गुढीपाडवा निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवतीर्थ येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मनसैनिक या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणात मनसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने राज ठाकरे यांचा विचार ऐकण्याकरता रवाना झाले आहेत. शेकडो बसेस तसेच खाजगी वाहनातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या मेळावा सहभागी होण्यासाठी निघाले आहेत तर अनेक कार्यकर्ते यांनी रेल्वेच्या मार्गातून प्रवास करून शिवतीर्थावर दाखल होणार आहेत. या सभेसाठी भिवंडीतून मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्ता रवाना झाल्या आहेत. राज ठाकरे यांचे विचार तसेच या मेळाव्यात राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार, कोणाची चिरफाड करतात, कोणता राजकीय पिक्चर रिलीज केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
पार्श्वभूमी
Raj Thackeray Speech LIVE : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मशिदीवरील भोंगे, मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेना, भाजप यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या सभेसाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत जमत आहेत. विशेषत: मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक-पालघरमधून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत आहेत.
Raj Thackeray Speech Live Updates: कल्याण डोंबिवलीतून सहा ते सात हजार कार्यकर्ते
मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे असून या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. सभेचे नियोजन दणक्यात होणार असून अख्ख्या देशात कुठल्याही पक्षांनी एवढी मोठी एलईडी लावली नसेल एवढी एलईडी सभेच्या ठिकाणी लावण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर येथून दोनशे बसेस जाणार आहे साधारणतः सहा ते सात हजार मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेला शिवाजी पार्क येथे उपस्थित राहणार आहेत.
पालघरच्या ग्रामीण भागातून ही मोठ्या प्रमाणावर मनसैनिक मुंबईकडे रवाना होत असून हे मनसैनिक पालघर मधील मनोहर येथे सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत जमण्यास सुरुवात झाली आहे. पालघरच्या ग्रामीण भागातील जवळपास चार ते पाच हजार मनसैनिक मुंबईत रवाना होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या मनसैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या मनसैनिकांसाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथे मनसे पदाधिकाऱ्यांकडून खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे . तसंच पालघर मधील ग्रामीण भागातील 100 बस आणि 800 खाजगी वाहनांनी हे मनसैनिक मुंबईकडे निघाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -