Raj Thackeray PC LIVE : भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरुच राहणार : राज ठाकरे

MNS chief Raj Thackeray PC LIVE : आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आजपासून सुरू झालेल्या या आंदोलनाबाबत ते कोणती भूमिका मांडणार, कार्यकर्त्यांना कोणते नवे आदेश देणार, हे पाहावं लागणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 May 2022 05:18 PM

पार्श्वभूमी

Raj Thackeray PC Live Updates : आज पहाटेपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसैनिकांनी आंदोलन छेडल्यानंतर या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय. यासंदर्भात आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत....More

मनसेचे नवनाथ कोठुनेंनी केली संजय राऊंत यांच्यावर टीका

त्रंबकेश्वर मंदिरात सकाळी आरती होत नाही हे विधान संजय राऊत या कोणत्या माहितीच्या आधारे केले आहे. स्वत:ला हिंदु म्हणवता मात्र हिंदूंच्या मंदिरात काय होते, कुठल्या आरती होतात तुम्हाला माहीत नाही. जनतेची दिशाभूल करू नका, असे नवनाथ कोठुने म्हणाले.