मुंबई : शिवसेनेने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने नीच राजकारण केलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे राजकारण कधीच विसरणार नाही. विसरलेलो नाही हे त्यांना भविष्यात कळेलच, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
‘’... तर सातही नगरसेवक पाठवले असते’’
नगरसेवक पैशांनी विकले गेले आहेत. शिवसेनेने नीच राजकारण खेळलं आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये याविषयी राग आहे. लोकांना हे आवडलेलं नाही, त्यामुळे ही लोकं मीच पाठवली आहेत, अशा सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. पाठवायचेच असते तर मी सात पाठवले असते. एकाला तरी कशाला ठेवलं असतं, एवढं दळभद्री राजकारण मला करता येत नाही आणि कधी करणारही नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
‘’यांच्या नीच राजकारणामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलो’’
शिवसेनेतून बाहेर पडताना बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर पक्ष स्थापनेचा काहीही विचार नव्हता. बाहेर पडलो तेव्हा अनेक जण माझ्यासोबत यायला तयार होते. पण असलं फोडाफोडीचं राजकारण करायचं नव्हतं. असं राजकारण बाळासाहेबांनी कधीच शिकवलं नाही. पण असल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळेच शिवसेना सोडली, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
‘’या घटनेची दीड महिन्यांपासून कुणकुण होती’’
जे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले त्याची कुणकुण दीड महिन्यांपासून होती. मात्र ज्यांनी स्वतःला बाजारात विकायला ठेवलंच आहे, त्यांना कुणी बोलू शकत नाही. जे मानसिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत, त्यांना ठेवून तरी काय करणार, पण महाराष्ट्रात राजकारण उमदं असावं. कुणी आयुष्यभर सत्तेत राहत नाही. एखादी गोष्ट करताना चुकीचा पायंडा पाडत नाही ना, याचं भान राजकीय पक्षांनी ठेवायला हवं, अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी व्यक्त केली.
‘’नगरसेवक फोडण्यासाठी 30 कोटी कुठून आले?’’
नगरसेवक फोडण्यासाठी पाच-पाच कोटी रुपये दिले, असं बोललं जातंय. सहा जण खरेदी करण्यासाठी 30 कोटी रुपये कुठून आले, असा सवालही राज ठाकरेंनी केला.
‘’आता गालावर टाळी’’
शिवसेनेने मदत मागितली असती तर त्यांना नक्की मदत केली असती. मात्र यापुढे आता थेट गालावर टाळी, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
‘’शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती’’
भांडुप पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप काय करेन, याची चिंता नव्हती. मात्र शिवसेनेकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती, असं राज ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या :
माफियांच्या पैशांवर शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी : किरीट सोमय्या
घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब
7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक
पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?
मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
शिवसेनेचं नीच राजकारण, उद्धवची खेळी कधीच विसरणार नाही : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Oct 2017 01:27 PM (IST)
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे राजकारण कधीच विसरणार नाही. विसरलेलो नाही हे त्यांना भविष्यात कळेलच, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
A
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -