मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवं कार्टून रेखाटलं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेलं व्यंगचित्र, राज ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे.


राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणूक निकालावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य केलं आहे.

घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, असं कार्टून राज ठाकरे यांनी रेखाटलं आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हात भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या घशात दाखवला आहे. अमित शाह खाली बसलेले आहेत. तर राहुल गांधींच्या बाजूला जनता दलाचे (सेक्युलर) नेते कुमारस्वामी दिसत आहेत.

 राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभेच्या निकालादिवशीही फेसबुक, ट्विटरवर पोस्ट केली होती. ईव्हीएमचा विजय असो, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला आहे.



कर्नाटक निकालावरुन टोला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने 104 जागा मिळवल्या आणि येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत, सत्तास्थापनेचा दावा केला.

हा संपूर्ण वाद कोर्टात गेला होता. कोर्टाने येडियुरप्पांना शनिवारी 19 मे रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र ते सिद्ध करण्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला.

त्यामुळे आता काँग्रेस-जेडीएसचं सरकार कर्नाटकात सत्तेवर येणार आहे. तर जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

संबंधित बातम्या  

 विषय चंद्राबाबूंचा, टार्गेट उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र 

 ‘कमल’ हसनवरुन भाजपवर निशाणा, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र 

 मराठी अस्मिता ठिगळं लावलेली, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र! 

 राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोहन भागवतांवर निशाणा

 राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोदींवर निशाणा, नवं व्यंगचित्र प्रसिद्ध

 भीमा-कोरेगाव घटनेबाबत राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून ‘फटकारे’

 राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरेंचा गांधी जयंतीनिमित्त व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा 

 मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र, राज ठाकरेंची दुसरी पोस्ट

जयंती विशेष: कॉमन मॅन ते मालगुडी डेज, आर के लक्ष्मण यांना सलाम!  

लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा!