मनसे-रिपाइंच्या सभा मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत : आठवले
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2017 06:51 PM (IST)
‘मनसे आणि रिपाइं या दोन्ही पक्षांच्या सभा मोठ्या होतात, मात्र मतं मिळत नाहीत. त्यामुळे आता मनसे आणि रिपाइं हा एकच प्रयोग शिल्लक राहिला आहे.'
मुंबई : ‘मनसे आणि रिपाइं या दोन्ही पक्षांच्या सभा मोठ्या होतात, मात्र मतं मिळत नाहीत. त्यामुळे आता मनसे आणि रिपाइं हा एकच प्रयोग शिल्लक राहिला आहे.' असं मिश्किल विधान रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे. रामदास आठवलेंच्या मातोश्रींचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे काल (बुधवार) राज ठाकरें यांनी रामदास आठवलेंच्या वांद्रेतल्या घरी सांत्वनपर भेट घेतली. पक्षाचे विचार वेगळे असले तरी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याची महाराष्ट्राची परंपरा असल्याचंही यावेळी आठवले म्हणाले. VIDEO: