मुंबई : महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे, त्यामुळे येत्या काही तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. मात्र, आज सकाळपासूनच राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

 

  • रत्नागिरीतील चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वरमध्ये जोरदार पाऊस


 

  • मुंबईतील अंधेरी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात,


 

  • ठाण्यात जोरदार पाऊस, तर कल्याणमध्ये रिमझिम सुरु


 

  • रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण तालुक्यांमधील काही भागात पावसाची रिमझिम सुरु झाली आहे.


 

  • दक्षिण मुंबईसह ठाण्यातील मुलुंड आणि परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे.


 

  • मुंबईतील दादर, वरळी, लोअर परळ भागातही पावसाच्या सरी


 

  • मुलुंड, चेंबूरमध्येही पावसाच्या सरी


 

  • नवी मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस