टीसीला शंका आली, प्रवाशाला तपासलं, 17 कोटीचं सोने सापडलं!
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2018 10:40 AM (IST)
मनीष हा मुंबईवरुन सुरतकडे तब्बल 17 कोटी रुपयांचं सोनं ट्रेनमधून घेऊन जात होता.
मुंबई: रेल्वेतील एका प्रवाशाकडे थोडेथोडके नाही तर तब्बल 17 कोटी रुपयांचं सोनं सापडलं आहे. मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसमधील प्रवाशाकडे हे सोनं सापडलं. मनीष असं या प्रवाशाचं नाव आहे. तो सूर्यनगरी एक्स्प्रेसमधील s9 कोचमध्ये बसला होता. मनीष हा मुंबईवरुन सुरतकडे तब्बल 17 कोटी रुपयांचं सोनं ट्रेनमधून घेऊन जात होता. त्यावेळी तिकीट चेकर अर्थात टीसीला संशय आला. टीसीने याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी मनीषला ताब्यात घेतलं. हे सोनं नेमकं किती आहे याची माहिती आपल्याला नाही, पण ते 17 कोटीचं आहे, असं मनीषने पोलिसांना सांगितलं. हे पार्सल सुरतला पोहोचवायचं होतं, त्याबदल्यात त्याला कमिशन मिळणार होतं. पोलिसांनी या सोन्याचं वजन केलं असता, ते 17 किलोपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. बाजारभावाप्रमाणे त्याचं मूल्य कोट्यवधीच्या घरात जातं. 17 किलो सोन्याची किंमत अंदाजे 5 कोटी 10 लाख रुपये आहे.