रेल्वे पोलिसांना जनजागृतीसाठी सापडला नवा पोस्टरबॉय
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2016 10:53 AM (IST)
मुंबई : रेल्वेमधून प्रवास करतानाच्या स्टंटबाजीविरोधात रेल्वे पोलीस जनजागृती करत आहेत. यासाठी रेल्वे पोलिसांना नवा पोस्टरबॉय सापडला आहे. करी रोड स्टेशनदरम्यान स्टंटबाजी करताना रेल्वेतून पडून जखमी झालेला युवक यापुढे रेल्वे पोलिसांचा पोस्टरबॉय असेल. रविवारी चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमधून चर्नीरोड स्टेशनवर 17 वर्षीय युवकाचा स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यानंतर रेल्वे पोलिसांनी फेस रेकग्निशन अॅपच्या माध्यमातून युवकाचा शोध घेतला. भाईंदर पूर्वेला राहणारा आलम खान यापुढे अँटी स्टंट ड्राईव्हचा चेहरा असेल. दरम्यान रेल्वेतून खाली पडूनही सुदैवानं आलम खानच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. यापुढे त्याचा चेहरा जनजागृतीसाठी वापरला जाणार आहे.