Diva Railway Station : कोकणात (Konkan) जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा दिवा रेल्वे स्टेशनवर (Diva Railway Station) खोळंबा झाला आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली आहे. काल पनवेल आणि कळंबोलीच्या दरम्यान मालगाडीचे डबे घसरले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिरानं धावत होत्या. तर आज अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थनकात रेल रोको केला. तर संतप्त प्रवाशांना बाजूला करुन लोकल आणि एक्स्प्रेसची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सुमारे 40 मिनिटं रेल्वे रोखून धरल्या नंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. लोकल वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली असून लवकरच कोकण रेल्वे मार्गाची वाहतूकसुद्धा सुरू होणार असल्याची माहिती स्टेशन मॅनेजर यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा दिवा रेल्वे स्टेशवर खोळंबा झाला असून त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. सुमारे 40 मिनिटं रेल्वे रोखून धरल्यानंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅक वरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय. काल पनवेल आणि कळंबोलीच्या दरम्यान मालगाडीचे डबे घसरले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. तर आज अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात. तसंच लोकल वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली असून लवकरच कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक सुद्धा सुरू होणार असल्याची माहिती स्टेशन मॅनेजर यांनी दिली आहे.
शनिवारी पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे घसरलेले
शनिवार (30 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी पनवेलवरुन वसईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले. यामध्ये वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान या घटनेविषयी समजातच मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी पथक पाठवण्यात आले. तसेच कल्याण आणि कुर्ला स्थानकावरुन अॅक्सिडेंट रिलीफ रेल्वे घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
रुळावरुन घसरलेले डबे बाजूला सारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान हे डबे कसे घसरले याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश मध्य रेल्वेकडून देण्यात आलेत. पण या दुर्घटनेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. तसेच यामुळे प्रवाश्यांना देखील त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.