मुंबई : मुंबईत आज दाट धुक्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरु असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वासिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला. जवळपास दीड तास हा रेल रोको सुरु होता.


आज पहाटेपासून सगळ्या मुंबईवर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. काही भागात धुकं इतकं दाट आहे की, काही अंतरावरचंही दिसत नाही.त्यामुळं दिवस उजाडूनसुद्धा रस्त्यांवर वाहनांना हेडलाईट लावल्याशिवाय पुढं जाता येत नाही आहे.

या धुक्याचा परिणाम रस्ते आणि लोकल वाहतुकीवर होत आहे. दाट धुक्यामुळे सर्वच लोकल अतिशय धिम्या गतीने चालत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे वरील वासिंद रेल्वे स्थानकातील संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला.

संतप्त प्रवाशांचा तब्बल दीड तास हा रेल रेको सुरु होता.