डोंबिवलीजवळ नागरिकांचा रेल रोको, रेल्वे वाहतूक ठप्प
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2017 12:49 PM (IST)
डोंबिवली: मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकाजवळ नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. डोंबिवली स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होती. त्यावर आज कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाजवळ असलेली अनधिकृत बांधकामं आज जमिनदोस्त करण्याची कारवाई सुरु आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईन संतप्त झालेल्या येथील नागरिकांना थेट आपला मोर्चा रेल्वेकडे वळवला. मागील बऱ्याच वेळापासून संतप्त नागरिकांनी रेल्वे रोखून धरल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना मात्र बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.