- हार्बर मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, तब्बल सहा तासांनी सीएसएमटी ते पनवेल लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरु, हार्बरसह ट्रान्सहार्बरवर मार्गावरही वाहतूक धीम्या गतीने
हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर, गर्दी कायम
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2018 03:07 PM (IST)
सणसवाडी परिसरातील दगडफेकीचा निषेध करण्यासाठी मुंबईत निदर्शनं करण्यात आली.
मुंबई : तब्बल सहा तासांनंतर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु झाली. पावणे पाचच्या सुमारास वाहतूक सुरु झाली. आंदोलकांनी ट्रॅक अडवल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत लागला. वाशी ते कुर्ला स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे हार्बर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच प्रवाशांना मानखुर्द स्थानकावरच उतरण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात येत आहे. हार्बरवरील वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवासी बस आणि इतर वाहनांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं अनेक रस्ते ट्रॅफिकनं जाम झाले आहेत. दरम्यान हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली असली तरी ट्रान्स हार्बरवर कोणताही परिणाम झालेला नाही. ट्रान्स हार्बरची वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. अफवा पसरणाऱ्यांवर कारवाई : मुख्यमंत्री आजही अफवांचं पेव फुटतंय. मात्र खोट्या गोष्टी पसरवू नये, असं आवाहन करतो. राज्यातील जनतेने संयम बाळगावा. सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल," अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसंच तेढ निर्माण करणारी विधानं कोणीही करु नये आणि कोणत्याही पक्ष नेतृत्त्वाने संयम बाळगला पाहिजे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.