मुंबई : एबीपी माझा आणि मी राहुल कुलकर्णी अजूनही आमच्या बातमीवर ठाम आहोत. अजूनही आम्ही आमची बातमी कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवरुन मागे घेतलेली नाही. लोकांचे प्रश्न मांडणे हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही मांडतचं राहणार. आमच्या बातमीमध्ये कुठल्याही स्टेशनचा उल्लेख नव्हता. तरीही तो जोडण्यात येऊन मला झालेली अटक चुकीची आहे. ज्या वाधवान कुटुंबीयांवर ईडीने गुन्हे दाखल केलेत. त्यांना महाबळेश्वरमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले. मग मला वेगळा न्याय का? असा प्रश्न एबीपी माझाचे प्रतिनिधी यांनी विचारला आहे. वांद्रे स्थानकाबाहेरील गर्दीला जबाबदार धरुन राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर लगेच कामावर रुजू होत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कोरोना व्हायरसमुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही कायम या संदर्भात सकारात्मक बातमी देण्याचा प्रयत्न करत आहोत. लॉकडाऊन वाढल्यामुळे अनेक बेरोजगार लोकांचा संयम सुटत चालला आहे. या पार्श्वभूमीवर साऊथ सेंट्रल रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत बैठकीत या कामगारांना सोडवण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. या पत्राच्या माध्यमातून आम्ही बातमी चालवली होती. यात रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार प्रशासन करत आहे. या कुठून कुठे सोडण्यात येणार आहे. कोणत्या विभागातून सोडण्यात येणार आहे. याचा काहीही उल्लेख केलेला नव्हता. मात्र, 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवल्यानंतर ही बातमी आम्ही पुन्हा चालवली नाही.

Bandra Incident | एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे गर्दी प्रकरणी जामीन मंजूर

मला वेगळा न्याय का?
असे असतानाही माझ्या घरी पोलिसांनी येऊन मला तत्काळ मुंबईला यावे लागेल असे सांगितले. राज्यात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असतानाही मला कोणत्याही सुरक्षेशिवाय मुंबईला आणण्यात आले. ते बरोबर होते का? हे प्रशसनाने तपासायला हवे. ज्या वाहनातून मला मुंबईला आणण्यात आले. तिथेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नसल्याचं राहुल कुलकर्णी म्हणाले. ज्या वाधवान कुटुंबीयांवर ईडीने गुन्हे दाखल केलेत. अशा कुटुंबाला तुम्ही महाबळेश्वरमध्ये क्वॉरंटाईन केलं. मग, मला वेगळा न्याय का? असा प्रश्नही एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

#ISupportRahulKulkarni | | अटक ते जामीन... राहुल कुलकर्णी यांच्याकडूनच ऐका घटनाक्रम | ABP Majha