मुंबई: एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठ सनदी अधिकारी आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
मात्र मोपलवारांना केवळ पदावरुन दूर करु नका तर त्यांना निलंबित करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
इतकंच नाही तर जो न्याय मोपलवारांना लावला आहे, तोच न्याय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना लावावा, त्यांनाही चौकशी होईपर्यंत मंत्रिपदावरुन हटवावं, अशी मागणी विरोधकांनी केली.
फडणवीस सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
मोपलवारांवर सेटलमेंटचे आरोप
मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाचं काम मोपलवारांना देण्यात आलं. मात्र राधेश्याम मोपलवारांवर सेटलमेंटचा आरोप असल्याची बातमी माझानं दाखवल्यानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले.
प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच विधानसभेतच ही घोषणा केल्याने मेहता यांचा पाय खोलात गेला आहे.
एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात झालेल्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी नियम 293 अन्वये
विरोधकांनी गेल्या आठवड्यात चर्चा उपस्थित केली होती. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केला होता.
3 केच्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण
विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता.
मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे या प्रकल्पाला मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचीही मान्यता होती का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात विचारला.
संबंधित बातम्या
मुख्यमंत्र्यांना न सांगताच 'अवगत' शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश
एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची 'समृद्धी'?
मोपलवारांना हटवलं, प्रकाश मेहतांनाही हटवा : विखे पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2017 01:25 PM (IST)
जो न्याय मोपलवारांना लावला आहे, तोच न्याय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना लावावा, त्यांनाही चौकशी होईपर्यंत मंत्रिपदावरुन हटवावं, अशी मागणी विरोधकांनी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -