मुंबई : आईस्क्रीममध्ये (Ice Cream) सापडलेले बोट पुण्याच्या इंदापूर (Pune Indapur) तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील कामगाराचेच असल्याचं आता स्पष्ट झालंय. डीएनए चाचणीतून हे स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, ओमकार पोटे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून 11 मे रोजी क्रशिंग मशीनवर काम करताना त्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांचे बोट कापले गेले आणि कापलेले बोट आईस्क्रीममध्ये पडले होते. अपघताबाबत माहिती मिळाल्यानंतर फॉर्च्यून डेअरीने तयार झालेले सर्वच आईस्क्रीमची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, मात्र तसे घडले नाही. हे आईस्क्रीम महिनाभराने 12 जून रोजी मालाड येथीस एका डॉक्टरच्या हाती लागले होते.
आईस्क्रीम कंपनीच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल
मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. या महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन मागवला होता. त्या आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठून पोलीस तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत पुण्यातील फॉर्च्युन डेयरी प्रकल्पापर्यंत पोहोचले. याच कंपनीत उत्पादन प्रक्रियेदरम्यान पोटे यांचे बोट कापले होते. दरम्यान, पोलिसांनी या बोटाचे आणि कर्मचारी पोटे यांच्या डीएनएचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले होते.हे नमुने कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले होतेय यम्मो आईस्क्रीम कंपनीच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोट कर्मचाऱ्याचे असल्याचे 'डीएनए' चाचणीत उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात बोटाच्या भागाचा डीएनए आणि आईस्क्रीम फॅक्टरीचे कर्मचारी ओंकार पोटे यांचा डीएनए एकच असल्याचे आढळले आहे. इंदापूर कारखान्यात आईस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे यांच्या मधल्या बोटाचा एक भाग कापला गेला होता. हे बोट मालाडच्या डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडले होते. त्यानंतर डॉक्टरांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली," असे अधिकाऱ्याने सांगितले. माहिती दिली. आइस्क्रीम कोनमध्ये सापडलेल्या बोटाचा तुकडा हा पुण्यातील इंदापूर येथील एका आईस्क्रीम कारखान्यातील कर्मचारी पोटे यांचे असल्याचे 'डीएनए' चाचणीत उघड झाले आहे.
हे ही वाचा :