माथेफिरु मुलाकडून वृध्द आईची हत्या, घटनेने भाईंदरमध्ये खळबळ
एबीपी माझा वेब टीम | 30 Mar 2019 04:41 PM (IST)
तो सध्या कोणतही काम करत नव्हता. आरोपीने आई नेहमी टॉर्चर करत होती. सतत भांडण करत असल्यामुळे रागाच्या भरात हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे.
भाईंदर : भाईंदरमध्ये एका माथेफिरु मुलाने आपल्याच 85 वर्षाच्या वृध्द जन्मदात्या आईची हत्या केली आहे. रमा मित्रा असं या दुर्दैवी मातेचं नाव आहे. सोमनाथ मित्रा असं आरोपाचं नाव आहे. आज सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली. भाईंदर पश्चिमेकडील मांडवी तलावाच्या शेजारील प्रतीक्षा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय सोमनाथ मित्राने आपल्या 85 वर्षीय वृध्द आई रमा मित्रा यांचं डोकं फर्शीवर आणि भिंतीवर आपटून तिची निर्घुणपणे हत्या केली. या कृत्यानंतर रक्ताने माखलेले हात घेवून तो खिडकीजवळ बडबड करत होता. नागरिकांनी पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आई आणि हा मुलगा त्या इमारतीमध्ये भाड्याने राहात होता. तो सध्या कोणतही काम करत नव्हता. आरोपीने आई नेहमी टॉर्चर करत होती. सतत भांडण करत असल्यामुळे रागाच्या भरात हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे.