मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या अंगावर केमिकल फेकणाऱ्या एका सायकोची (माथेफिरु) महिलांमध्ये दहशत पसरली आहे. रेल्लेमधून प्रवास करणाऱ्या आठ महिलांच्या अंगावर या माथेफिरुने केमिकल अटॅक केला आहे. गर्दीचा फायदा घेत हा सायको महिलांच्या गुप्तांगावर केमिकल फेकून तो जातो. पोलीसांकडून त्याचा शोध सुरु आहे.
अंगावर ज्या ठिकाणी केमिकल पडते. तिथले कपडे जळून शरीराचा भाग दिसू लागतो. माथेफिरुने मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर 8 महिलांच्या अंगावर केमिकल फेकून तो पळून गेला. त्यापैकी चार महिलांनी पोलिसांत तक्रार केल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. पोलिसांनी या माथेफिरुचा शोध सुरु केला आहे.
पश्चिम रेल्व मार्गावर सर्वाधिक गर्दी असलेल्या रेल्वेस्थानकांपैकी एक अंधेरी रेल्वे स्थानकावर 8 महिलांच्या अंगावर या माथेफिरुने केमिकल फेकले आहे. हा माथेफिरु महिलांच्या गुप्तांगावर केमिकल फेकतो. ज्या जागेवर केमिकल फेकले आहे. तिथले कपडे जळून जातात. त्यामुळे पीडितांच्या शरीराचा भाग दिसतो. तसेच शरीराचा तो भागही भाजला जातो.
आज सकाळीदेखील या माथेफिरुने एका मुलीच्या अंगावर केमिकल फेकले. मुलीचे जळालेले कपडे पाहून तिथे हजर असलेल्या निर्भया पथकाने त्या मुलीची मदत केली.
मुंबई लोकलमध्ये महिलांवर केमिकल टाकणाऱ्या माथेफिरुची दहशत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2019 05:03 PM (IST)
लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या अंगावर केमिकल फेकणाऱ्या एका सायकोची (माथेफिरु)महिलांमध्ये दहशत पसरली आहे. रेल्लेमधून प्रवास करणाऱ्या आठ महिलांच्या अंगावर या माथेफिरुने केमिकल अटॅक केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -