यासंदर्भात आज खाजगी संस्थाचालक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांमध्ये बैठक झाली. त्यात तोडगा निघाला आहे. खाजगी महाविद्यालयाच्या शुल्काबद्दल वाद आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण शुल्क समितीसोबत संस्थाचालकांची बैठक होणार आहे. त्यात शुल्क वाढीबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यातल्या जवळपास 40 मेडिकल आणि डेन्टल कॉलेजेसनी वार्षिक फीमध्ये वाढ करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यावरुनच हा वाद सुरु होता. अखेर यावर तोडगा निघाल्यानं विद्यार्थ्यांच्या जीव भांड्यात पडला आहे.