मुंबई: मुंबईकरांसाठी एक खुशखबर, उद्यापासून बेस्ट बसचा प्रवास स्वस्त होणार आहे. गेल्या वर्षभरात दोनदा भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र बेस्टच्या प्रवासी संख्येत 35 लाखांवरून थेट 28 लाखापर्यंत घट झाली. त्यामुळे वातानुकूलीत गाड्यांचं भाडं, तसंच भाडेटप्प्यात 8, 12, 17, 25, 35, 45 या टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच मासिक पासाच्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे.


 

बेस्ट समिती आणि महापालिकेच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणानेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सध्या प्रवाशांकडून २४ दिवसांच्या तिकिटांवर मासिक पास आकारला जातो. आता हाच पास २२ दिवसांवर आकारला जाणार आहे.

 

म्हणजेच ६६ दिवसांच्या तिकिटाच्या शुल्कावर प्रवाशांना ९० दिवस प्रवास करता येणार आहे. याशिवाय वातानुकूलित गाडय़ांचे तिकीट दरांसह मासिकपासही स्वस्त करण्यात आले.