अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांना मरणोत्तर राष्ट्रपती पुरस्कार
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 01:45 PM (IST)
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अग्निश्मन दलाच्या चार अधिकाऱ्यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाले असून एकूण सहा जणांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. मुंबईच्या काळबादेवी आगीत शहीद झालेले सुनील नेसरीकर (मुख्य अग्निशमन अधिकारी) आणि सुधीर आमीन (उपमुख्य अग्निशमन अधिकारी) यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर संजय राणे (सहाय्यक विभागीय अधिकारी), महेंद्र देसाई (केंद्र अधिकारी) यांनाही मरणोत्तर पुरस्कार घोषित झाला आहे. अमोल मुलिक (सहाय्यक केंद्र अधिकारी) आणि भूषण निंबाळकर (अग्निशमक) यांनाही राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत.