मुंबई :  हिंसा सोडल्यास लोकशाही न मानणाऱ्यांनाही सोबत घ्यायला तयार आहोत, असी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.


भीमा-कोरेगावला झालेला दुर्दैवी प्रकार, महाराष्ट्र बंद आणि त्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंच्या अटकेची मागणी या आणि अशाच सर्व मुद्यांवर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाला सविस्तर मुलाखत दिली.

“शांततेच्या मार्गाने जगणाऱ्या माणसाने लोकशाहीच मानली पाहिजे, असे नाही. जगणाऱ्या माणसाने हिंसा हा त्याचा मार्ग असता कामा नये. आणि हिंसेपासून प्रवृत्त करणे, हे आमचे कार्य म्हणून आम्ही समजतो.”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी त्यांनी उमर खालिदच्या एल्गार परिषदेतील सहभागाचं समर्थन केलं तर त्याचवेळी भिडे आणि एकबोटेंच्या अटकेची मागणी लावून धरली. दलित-मराठा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली. मात्र हिंसा सोडल्यास लोकशाही न मानणाऱ्यांनाही सोबत घेऊ अशी खळबळजनक भूमिका त्यांनी घेतली.

पाहा प्रकाश आंबेडकरांची संपूर्ण मुलाखत :