मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होत असतात, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी आठवलेंवर केली आहे.


आपल्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की,  माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही. माझ्यावर झालेल्या धक्काबुक्की मागे कोणतंही षडयंत्र असल्याचं मला वाटत नाही. कारण विविध पक्षातील नेते माझे चांगले मित्र आहे. मात्र माझ्यावर करणाऱ्या प्रवीण गोसावीमागे कुणाचे हात आहेत. त्याने माझ्यावर हल्ला नेमका का केला? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही आठवलेंनी केली.


काय आहे प्रकरण?


केंद्रीय मंत्री रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना प्रवीण गोसावी या तरुणानं धक्काबुक्की केली होती. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला प्रवीणला बेदम चोप दिला. आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गोसावीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली.


आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याची पार्श्वभूमी

- प्रवीण गोसावी हा मूळचा अमरावती जिल्ह्यातला असून सध्या अंबरनाथच्या लक्ष्मीनगर भागात राहतो
- सुरुवातीला रिक्षाचालक होता, मनसे वाहतूक सेनेचा पदाधिकारी होता, आता बांधकाम व्यावसायिक आहे
- अंबरनाथ शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख
- एकदा नगरपालिकेविरोधात उपोषण केलं , तर एकदा पालिकेच्या लिपिकाला एसीबीमार्फत पकडून दिलं आहे
- मनसेची भूमिका पटेनाशी झाल्यानं मनसेतून बाहेर पडला, त्यावेळीही राज ठाकरेंविरोधात फेसबुकवर लिखाण केलं
- यानंतर काही काळ आरपीआय आठवले गटात सक्रिय, मात्र त्यातूनही बाहेर पडला आणि आठवलेंविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत
- सध्या भारिप बहुजन महासंघात सक्रिय असून रामदास आठवलेंचा तिरस्कार अनेकदा त्याच्या बोलण्यातून आणि पोस्टमधून दिसून आलाय
- रामदास आठवले यांना समाजाशी देणं घेणं नसून फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करत असल्याचा गोसावी याचा आरोप आहे
- याच रागातून त्याने काल आठवले यांच्यावर हल्ला केल्याची शक्यता आहे




संबंधित बातम्या