मुंबई : भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला महाराष्ट्र बंद’ आज मागे घेतला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली.


बंद शांततेत पार पडल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील 50 टक्के जनता आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होती.”

देशातील काही हिंदू संघटना देशात गोंधळ निर्माण करण्यासाठीच आहेत. काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवाय, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे दोघेजण भीमा-कोरेगाव हिंसाराचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचा पुनरुच्चारही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.

जो न्याय मुंबई हल्ल्यातील याकूब मेमन याला सुप्रीम कोर्टाने लावला, तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना लावावा, अशी मागणीही आंबेडकरांनी केली.

भीमा कोरेगावमधील कार्यक्रम ही सभा नव्हती. उमर खालिद आणि जिग्नेश मेवानी यांची नावं घेतली जात आहेत. पण त्यांचा याच्याशी संबंध नाही, असेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

डोंबिवलीत तिकीटघर फोडलं, कांजुरमार्गला खुर्च्या-लाईट्सची तोडफोड

महाराष्ट्र बंद : मुंबईतील रास्तारोको-आंदोलनाचे फोटो

याकूबप्रमाणे संभाजी भिडे, एकबोटेंवर गुन्हे दाखल करा: आंबेडकर

VIDEO : प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद